ऑनलाईन व्दितीय अपील पोर्टल वापरण्‍याबाबत मार्गदर्शक सुचना

राज्य माहिती आयोग

 • या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, माहितीचा अधिकारांतर्गत ऑनलाईन व्दितीय अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे व्दितीय अपील शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना व्दितीय अपील सादर करता येईल.

विभागांची यादी

 1. सहकार, वस्त्रोद्योग आणि विपणन विभाग
 2. पर्यावरण विभाग
 3. वित्त विभाग
 4. सामान्य प्रशासन विभाग
 5. उच्च व तंत्र शिक्षण विभाग
 6. गृह विभाग
 7. गृहनिर्माण विभाग
 8. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग
 9. माहिती तंत्रज्ञान विभाग
 10. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
 11. सार्वजनिक आरोग्य विभाग
 12. महसूल आणि वन विभाग
 13. ग्राम विकास व जलसंधारण विभाग
 14. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
 15. राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई
 16. जलसंपदा विभाग
 17. विधी व न्याय विभाग

 • अपील दाखल' करा हे बटण दाबल्यानंतर येणाऱ्या पृष्ठावरील * अशी खूण केलेले सर्व रकान्यांतील माहिती भरणे बंधनकारक आहे.
 • अर्जातील माहिती त्या-त्या रकान्यात 150 शब्द मर्यादेपर्यंत भरता येईल.
 • एखाद्या प्रकरणी अर्जातील माहिती 150 शब्दांपेक्षा जास्त असेल तर ती माहिती वेगळ्याने स्कॅन करुन अपलोड करावी.
 • द्रारिद्रय रेषेखालील अपिलार्थी वगळून अन्य अपिलार्थीनी ऑनलाईन द्वितीय अपील अर्जाच्या पहिल्या पृष्ठावरील माहिती भरल्यानंतर विहित शुल्क अदा करण्यासाठी 'पेमेंट पेज' (payment page) वरील ‘make payment’ येथे click करावे.
 • "अपिलार्थीना द्वितीय अपिलाकरिता विहित शुल्क पुढील मार्गानेही अदा करता येईल: (i) इंटरनेट बँकींग (ii) ए.टी.एम.-कम-डेबिट कार्ड (iii) व्हिजा/मास्टर क्रेडिट कार्ड."
 • विहित शुल्क अदा केल्यानंतर द्वितीय अपील अर्ज दाखल करुन घेतला जाईल व त्याला एक निश्चित नोंदणी क्रमांक देण्यात येईल. तो अपिलार्थीस एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. हा नोंदणी क्रमांक अपिलार्थीस त्यांच्या अपिलाच्या अनुषंगाने भविष्यात संदर्भासाठी वापरता येईल.
 • माहितीचा अधिकार नियम, 2012 मधील तरतूदीनुसार द्रारिद्रय रेषेखालील अपिलार्थीना शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तथापि, त्‍या अपिलार्थीनी, त्या पृष्ट्यर्थ संबंधित शासकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले द्रारिद्रय रेषा प्रमाणपत्र द्वितीय अपील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • "अपिलार्थीनी सादर केलेले ऑनलाईन द्वितीय अपील, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने राज्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांकडे जाईल. नोडल अधिकारी हे अपील इलेक्ट्रॉनिक अथवा प्रत्यक्ष (physically) रितीने संबंधित सहायक कक्ष अधिकाऱ्यांकडे पाठवील. "
 • ऑनलाईन द्वितीय अपील संदर्भात अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास तसे सहायक कक्ष अधिकारी अपिलार्थीस कळवून द्वितीय अपील अर्ज परत करतील. अपिलार्थीस 'View Status' या पर्यायाद्वारे ही सद्य:स्थिती समजू शकेल. तसेच, या संबंधीचा E-mail अपिलार्थीस पाठविण्यात येईल.
 • नोंदणी क्रमांक अपिलार्थीस त्यांच्या अपिलाच्या अनुषंगाने भविष्यात संदर्भासाठी वापरता येईल.
 • "माहितीचा अधिकार नियम, 2012 मधील तरतूदीनुसार द्वितीय अपील अर्ज सादर करताना रु. 20/- इतके विहित केलेले शुल्क अदा करणे आवश्यक आहे. "
 • "अपिलार्थी पुढील बाबींची सद्य:स्थिती तपासू शकतो: 1. द्वितीय अपील सादर केल्याचा दिनांक, 2. काही सहाय्यभूत कागदपत्रे मागविली असल्यास, 3. द्वितीय अपील सुनावणी व निर्णयाचा दिनांक. "
 • एस.एम.एस. प्राप्त होण्याकरिता अपिलार्थीनी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे.
 • माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत द्वितीय अपील अर्ज दाखल करण्याबाबतच्या व इतर तरतुदी उदा.कालमर्यादा,अपवाद इत्याद‍ि सर्व लागू राहतील.
वरील मार्गदर्शक सुचना मी वाचल्यात आणि त्या मला मान्य आहेत